📢 ग्रामपंचायत तर्फे आवाहन – सर्व ग्रामस्थांनी वेळेत मालमत्ता कर, पाणीपट्टी व इतर कर भरणा करून सहकार्य करावे. | 💰 वेळेत कर भरणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. | ⚠️ कर न भरल्यास दंड आकारला जाईल.      📢 ग्रामपंचायत तर्फे आवाहन – सर्व ग्रामस्थांनी वेळेत मालमत्ता कर, पाणीपट्टी व इतर कर भरणा करून सहकार्य करावे. | 💰 वेळेत कर भरणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. | ⚠️ कर न भरल्यास दंड आकारला जाईल. 📢 ग्रामपंचायत तर्फे आवाहन – सर्व ग्रामस्थांनी वेळेत मालमत्ता कर, पाणीपट्टी व इतर कर भरणा करून सहकार्य करावे. | 💰 वेळेत कर भरणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. | ⚠️ कर न भरल्यास दंड आकारला जाईल.
स्थापना वर्ष :-१९६६

कौंची-मांची ग्रामपंचायतीत आपले हार्दिक स्वागत आहे

कौंची-मांची ही दोन्ही गावे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तहसीलमध्ये वसलेली आहेत. कौंची हे संगमनेरपासून १६ कि.मी. आणि अहमदनगरपासून ८५ कि.मी. अंतरावर आहे, तर मांची हे संगमनेरपासून १८ कि.मी. आणि अहमदनगरपासून ७५ कि.मी. अंतरावर आहे.

येथील नागरिक प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असून परिश्रम, एकोपा आणि परंपरा हे या दोन्ही गावांचे मुख्य आधारस्तंभ आहेत. हिरवीगार शेती, निसर्गरम्य शिवारं आणि साधेपणाने नांदणारे गावकरी हे कौंची व मांची गावाचे खरे सौंदर्य आहे. दोन्ही गावात सामाजिक व सांस्कृतिक जीवन समृद्ध असून विविध उत्सव आणि लोकपरंपरा दोघी गावा कडून येथे जपल्या जातात.

समानता, कार्यक्षमता आणि संधी या तिन्ही तत्वांवर आधारित निर्णय घेऊन गावाची प्रगती सुनिश्चित केली जाते.

स्वच्छ गाव सुंदर गाव

ग्रामपंचायतचा संकल्प “स्वच्छता, एकजूट आणि विकास”. प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग आणि जबाबदारीमुळे आपले गाव हरित, स्वच्छ व आदर्श बनले आहे. आज आपल्या गावात स्वच्छ रस्ते, सुंदर देवळे, शैक्षणिक संस्था आणि समाजातील एकोपा यांचा संगम पाहायला मिळतो. चला, आपण सर्व मिळून पुढच्या पिढीसाठी एक समृद्ध आणि आदर्श गाव घडवूया.

लोकशाहीचा खरा अनुभव प्रत्येकासाठी निर्णय

दृष्टिकोन व विकासाचे उद्दिष्टे

गावातील प्रत्येक नागरिकाचा सर्वांगीण विकास करून गाव स्वच्छ, निरोगी, आत्मनिर्भर आणि आदर्श गाव म्हणून घडवणे. यासाठी ग्रामपंचायत सर्वसामान्य गावाचे नेतृत्व करताना सामाजिक ऐक्य, यावर विशेष भर दिला जातो.
ग्रामपंचायतच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवणे. शेती, शिक्षण, आरोग्य, उद्योग-व्यवसाय, महिला व बालविकास यांना चालना देणे. पर्यावरण संवर्धन, पाण्याचे योग्य व्यवस्थापन व हरितग्राम संकल्पना राबवणे.
निसर्गरम्य परिसर व शेतीप्रधान जीवनशैली. पाणी व जमीन याचा योग्य उपयोग. पारंपरिक उत्सव, जत्रा व सांस्कृतिक वारसा. ग्रामपंचायतीमार्फत लोकसहभाग. सामाजिक एकोपा व परस्पर सहकार्य. स्वावलंबी व आत्मनिर्भर गाव घडवणे.
लोकसेवा - पारदर्शकता - विकास

ग्रामपंचायत संचालकमंडळ

सरपंच

सौ. अमृता जयराम भास्कर

सरपंच
ग्रामसेवक

सौ. अलका कोंडाजी भाडेकर

ग्रामसेवक

ग्रामपंचायत लोकसंख्या
२०११ च्या जनगणनेवर आधारित

एकूण लोकसंख्या
0
महिला
0
पुरुष
0
ग्रामपंचायत योजना

नागरिकांसाठी उपलब्ध योजना

ग्रामपंचायतद्वारे नागरिकांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजना खालीलप्रमाणे आहेत. प्रत्येक योजनेची माहिती पाहण्यासाठी बघा वर क्लिक करा.

क्रमांक योजनेचे नाव क्रिया
1 प्रधान मंत्री आवास योजना बघा
2 जल जीवन मिशन बघा
3 १५ वित्त आयोग बघा
4 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना बघा
5 तांडा/वस्ती योजना बघा
6 अनुसूचीत जाती व नवबौध्द विकास योजना बघा
7 रमाई आवास योजना बघा
8 शबरी आवास योजना बघा
9 जलयुक्त शिवार योजना बघा
10 प्रधानमंत्री सूर्य घर योजना बघा
11 इंदिरा गांधी विधवा महिला योजना बघा

जलयुक्त शिवार अभियान 2.0

माझा थेंब, माझी जबाबदारी!

जलयुक्त शिवार अभियानात ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग आहे. या उपक्रमातून पाणी साठवण क्षमता वाढवणे, सिंचनाचे क्षेत्र विस्तार करणे आणि गावाला पाण्याच्या समस्येतून मुक्त करण्यासाठी विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. प्रत्येक ग्रामस्थाचा सहभाग या अभियानाला यशस्वी बनवतो.