कौंची-मांची ही दोन्ही गावे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तहसीलमध्ये वसलेली आहेत. कौंची हे संगमनेरपासून २६ किमी आणि अहमदनगरपासून ८५ किमी अंतरावर आहे, तर मांची हे संगमनेरपासून १८ किमी आणि अहमदनगरपासून ७५ किमी अंतरावर आहे.
येथील नागरिक प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असून परिश्रम, एकोपा आणि परंपरा हे या दोन्ही गावांचे मुख्य आधारस्तंभ आहेत. हिरवीगार शेती, निसर्गरम्य शिवारं आणि साधेपणाने नांदणारे गावकरी हे कौंची व मांची गावाचे खरे सौंदर्य आहे. दोन्ही गावात सामाजिक व सांस्कृतिक जीवन समृद्ध असून विविध उत्सव आणि लोकपरंपरा दोघी गावा कडून येथे जपल्या जातात.
समानता, कार्यक्षमता आणि संधी या तिन्ही तत्वांवर आधारित निर्णय घेऊन गावाची प्रगती सुनिश्चित केली जाते.










